कल्याण
रेल्वे स्टेशन परिसरात सुरू विविध विकासकामामुळे पश्चिम परिसरातील वाहतूक कोंडी,फेरीवाला , वेश्याव्यवसायाने रेल्वे स्टेशनला गराडा घातला असून यामुळे सामान्य गृहणी,नोकरदार महिला,विद्यार्थिनी,वयोवृद्ध नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. याच्या निषेधार्थ म्हणून राणी कपोते यांनी रेल्वे स्टेशन परिसरात स्मार्ट सिरी पुलाच्या खाली पालिकेच्या दिवंगत दिलीप कपोते वाहनतळ समोर 31 मे पासून बेमुदत उपोषण सुरू केलं आहे.
कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात बजबजपुरी निर्माण झाली असून त्याचा सामान्य कर दात्या नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय.
महापालिका आणि पोलिस प्रशासन डोळे झाकून गप्प बसले आहेत. वारंवार लेखी तक्रारी देऊनही पालिका प्रशासनाने स्टेशन परिसरातील अनधिकृत फेरीवाला हटवला नाही. त्याच बरोबर स्काय वॉक वर खुले आम वेश्या व्यवसाय करणाऱ्या परप्रांतीय महिलांना रोखू शकले नाहीत.
पोलिस प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी म्हणून बेमुदत उपोषण आपण सुरू केल्याचं कपोते यांनी सांगितले.