महापालिका क्षेत्रातील खड्ड्यांवर प्रशासन गंभीर असल्याचे पालिका आयुक्त अभिनव गोयल माध्यमांशी बोलताना सांगत असले तरीही शहरातील खड्ड्यांची समस्या दूर होताना दिसत नाही.पावसामुळे शहरात अजून खड्ड्यांचा सुकाळ झाला आहे. येत्या 27 ऑगस्ट रोजी गणपतीचे आगमन होणार असून पालिका प्रशासनाने युद्धपातळीवर खड्ड्यांचा बंदोबस्त करायला सुरुवात केली आहे.
मात्र ठेकेदार निकृष्ट दर्जाचे साहित्य वापर करीत असल्यामुळे तातडीने बुजवलेले खड्डे पुन्हा पावसाच्या एका सहित डांबरं खडी मोकळी होण्याचे प्रकार सुरू आहे.
22,23 ऑगस्ट च्या रात्री मनपा बांधकाम विभागाने ठेकेदारांच्या मदतीने काही प्रमुख चौकातील रस्त्यावर डांबरीकरण करून खड्डे भरण्याचे काम केलं होते परंतु जोरदार पावसामुळे डांबरीकरण मटेरियल वाहून गेले.त्याजागी पुन्हा खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झालं आहे. खड्ड्यांवर उपाय योजना करताना महापालिका बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांची आता तारेवरील कसरत सुरू आहे.

