कल्याण डोंबिवली महापालिकेच्या 21 विविध संवर्गातील 490 पदांच्या सरळ सेवा भरतीसाठी येत्या 9 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर 2025 या कालावधीत ऑन लाईन लेखी परिक्षा घेण्यात येणार असून राज्यातील 14 जिल्ह्यात त्याचे 25 केंद्रात नियोजन करण्यात येणार आहे. यासाठी पालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी मार्गदर्शक तत्वे जाहीर करून 29 ऑगस्ट रोजी एक आदेश काढला असून त्यानुसार पालिकेच्या तांत्रिक अतांत्रिक विभागातील वर्ग दोन अधिकाऱ्यांना समन्वय , निरिक्षक पदांवर नेमले गेले आहेत.
टाटा ग्रुपच्या नामांकित TCS कंपनी माध्यमातून या सरळ सेवा भरतीचे व्यवस्थापन करण्यात आले आहे. पालिका सामान्य प्रशासन विभागाने आयुक्तांच्या मूळ आदेशानंतर पुन्हा दुरुस्ती आदेश काढून काही वादग्रस्त अधिकाऱ्यांचे नावे वगळून काही लोकांच्या ठिकाणात बदल केला आहे. अत्यंत गोपनीय पद्धत असूनही केडीएमसी प्रशासनाने यात वादग्रस्त अभियंत्यांना या केंद्रावर समन्वय निरीक्षक म्हणून नेमल्यामुळे पालिकेच्या या निर्णयाकडे लोकांचे लक्ष लागले आहे.

