शिवसेना शिंदे गटाचे तालुका संघटक सुधीर शेलार यांच्या हस्ते झाले उद्घाटन…
जळगाव प्रतिनिधी: पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा खुर्द येथे आज स्वराज्य मित्र मंडळातर्फे भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन आज शिवसेना शिंदे गटाचे पाचोरा तालुका संघटक सुधीर शेलार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्वराज्य मित्र मंडळ चे पदाधिकारी पवन सुर्यवंशी,ओम शेलार,यौगेश परदेशी,रवि देवरे,खडकदेवळा खुर्द गावाचे सरपंच पती सुदाम वाघ, पोलीस पाटील तुकाराम तेली, तंटामुक्त अध्यक्ष नवाब शेख, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष हनिफ शेख, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य युवा नेते बापू पाटील, खडकदेवळा खुर्द गावाचे माजी सरपंच शालिग्राम शेलार, ग्रामपंचायत सदस्य आयुब तडवी, माजी ग्रामपंचायत सदस्य बालु परदेशी, पत्रकार संरक्षण समिती जळगाव जिल्हाध्यक्ष आत्माराम गायकवाड,गजानन तेली, गणेश तेली, एकनाथ बनसोडे,शाल्लीक दाभाडे, मुकेश पाटील आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन करून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. या स्पर्धेसाठी प्रथम 11 हजाराचे बक्षीस शिवसेना शिंदे गटाचे तालुका संघटक सुधीर शेलार यांच्यातर्फे जाहीर केले आहे. तर दुसरे बक्षीस खडकदेवळा खुर्द गावाचे सरपंच पती सुदाम वाघ यांच्यातर्फे 7 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. तर तिसरे बक्षीस शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हनीफ शेख यांच्या तर्फे 5 हजारांचे बक्षीस जाहीर केले आहे. खडकदेवळा खुर्द येथील स्वराज्य मित्र मंडळ च्या वतीने भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा ही श्री रामनवमी निमित्ताने आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा दोन दिवस चालणार आहे. या स्पर्धेमध्ये प्रथम व द्वितीय व तृतीय अशा स्पर्धकांना योग्य ते बक्षीस देखील दिले जाणार आहे.त्यामुळे कोण बक्षीस जिंकणार याकडे लक्ष लागले आहे.
हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतिक…
खडकदेवळा खुर्द येथील स्वराज्य मित्र मंडळातर्फे श्री रामनवमी निमित्ताने भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी विशेष म्हणजे तिसरे बक्षीस बक्षीस हे येथील शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष हनिफ शेख या मुस्लिम युवकाने पुढे येऊन तब्बल 5 हजाराचे बक्षीस जाहीर केले आहे.त्यामुळे श्री रामनवमी निमित्ताने आयोजित केलेल्या या स्पर्धेसाठी मुस्लिम युवकांने पुढाकार घेऊन जाहीर केलेले बक्षिसाची चर्चा सध्या सुरू आहे.यामुळे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक या ठिकाणी दिसून आले.
उत्कृष्ट खेळाडूंना मिळणार बक्षीस….
स्वराज्य मित्र मंडळातर्फे भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेचे प्रथम, द्वितीय व तृतीय असे तीन बक्षीस जाहीर केलेले असले तरी कोणत्याही टीम मधील खेळाडू ने चांगले उत्कृष्ट कामगिरी केल्यास त्यांना देखील योग्य ते बक्षीस जाहीर केले आहे.
खेळाडूंसाठी टी-शर्टची भेट…
स्वराज्य मित्र मंडळातर्फे आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी येणाऱ्या खेळाडूंना शिवसेना शिंदे गटाचे तालुका संघटक सुधीर शेलार,रिल स्टार जगदीश तेली, भूषण राजपूत यांनी खेळाडूंसाठी आपापल्या परीने टी-शर्ट भेट दिली.
भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी ग्राउंड दिले मोफत…
श्री रामनवमी निमित्त दोन दिवस चालणाऱ्या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी खडकदेवळा खुर्द गावाचे विजय भास्करराव शेलार यांनी आपल्या स्वतःच्या मालकीचे शेत दोन दिवस स्पर्धेसाठी मोफत उपलब्ध करून दिले आहे.