Close Menu
    अधिक वाचा

    लता दिदींच्या अजरामर गाण्यांचा ‘ मेरा साया साथ होगा’ हा सांस्कृतिक कार्यक्रमाचे स्वा. सावरकर सभागृह शिवाजी पार्क दादर मुंबई येथे आयोजन

    मराठी भाषेतील अभिजात सौंदर्य या विषयावर व्याख्यान – थेटभेट प्रवीण दवणे

    Kalyan श्री स्वामी सहजानंद चौक मंडळाचे नवरात्रोत्सवाचे 50वे वर्ष

    KDMC ऑन लाईन लेखी परिक्षा घेण्यात येणार असून राज्यातील 14 जिल्ह्यात त्याचे 25 केंद्रात नियोजन

    Facebook X (Twitter) Instagram
    Post Marathi DigitalPost Marathi Digital
    Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
    • मुख्य पान
    • बातम्या
    • 36 जिल्हे विशेष घडामोडी
    • बोला नगरसेवक
    • महापालिका विशेष बातम्या
    • राजकीय कट्टा
    • अभिव्यक्ती स्वातंत्र्य
    Post Marathi DigitalPost Marathi Digital
    Home»News»मराठी चित्रपटसृष्टीने जागतिक झेप घ्यावी : सुधीर मुनगंटीवार यांची अपेक्षा

    मराठी चित्रपटसृष्टीने जागतिक झेप घ्यावी : सुधीर मुनगंटीवार यांची अपेक्षा

    0 Views
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    दर्जेदार मराठी चित्रपट निर्मात्यांना २९ कोटी २२ लाख रूपयांच्या धनादेशाचे वितरण

    शासन नेहमीच मराठी चित्रपटसृष्टीच्या पाठीशी ठामपणे उभे असून मराठी चित्रपटसृष्टीने आता जागतिक झेप घ्यावी, असे प्रतिपादन ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले. दर्जेदार मराठी चित्रपटांना अनुदान वाटपाच्या कार्यक्रमात सह्याद्री अतिथीगृहात ते आज बोलत होते.

    यावेळी बोलतांना ते पुढे म्हणाले की, मुंबई कोल्हापूर प्रमाणे लवकरच नागपूर मध्ये सुद्धा 150 एकर जागेमध्ये फिल्म सिटी तयार करणार असून मराठी चित्रपट निर्मात्यांना शासनाकडून देण्यात येणाऱ्या विविध परवानग्यासाठी एक खिडकी योजनेची अंमलबजावणी करणार आहे तसेच राज्यात 75 नवीन चित्रनाट्य गृहे बनविण्यात येणार आहेत. तसेच नरिमन पाँईट येथे मराठी चित्रपट गृह उभारण्यात येणार असल्याचेही सांस्कृतिक कार्य मंत्री श्री.सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.

    आज सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास मंडळामार्फत दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीस अर्थसाहाय्य योजनेतर्गत आयोजित केलेला धनादेश वितरण कार्यक्रमात मंत्री श्री. मुनगंटीवार बोलत होते. दादासाहेव फाळके चित्रनगरी (filmcity) च्या 47 वर्धापन दिनाचा मुहूर्त साधून या चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास मंडळाने आजच्या दिवशी या कार्यक्रमाचे आयोजन केले. अ, ब आणि क या तीन श्रेणीत मोडणाऱ्या दर्जेदार चित्रपटाना हे अर्थसहाय्य देण्यात आले. या कार्यक्रमात अपर मुख्य सचिव विकास खारगे,महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास मंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील, सह व्यवस्थापकीय संचालक धनंजय सावळकर यावेळी उपस्थित होते.

    मंत्री श्री.मुनगंटीवार पुढे म्हणाले की, निर्मात्यांना जिथे चित्रीकरण करायचंय तिथे त्यांना निशुल्क चित्रीकरण करता येणार आहे. उत्तम चित्रपट तयार करण्यासाठी निर्मात्यांनी खूप मेहेनत घेतलेली असते पण कधी यश मिळते तर कधी अपयशाला सामोरे जावे लागते, मात्र त्यामुळे खचून जायचे नसते.

    दादासाहेब फाळके यांनी चित्रपट सृष्टीची सुरुवात केली. दादा कोंडके या साध्या माणसाचे सगळे चित्रपट रौप्य महोत्सवी ठरले. तर रजनीकांत या मराठी अभिनेत्याने आपल्या अभिनयाच्या जोरावर दक्षिणेत सर्वांची मने जिंकली. त्यांचा आदर्श मराठी चित्रपटसृष्टीने समोर ठेवावा, असेही ते म्हणाले.

    दर्जेदार चित्रपट निर्मात्यांना शासनामार्फत आर्थिक पाठबळ मिळावं यासाठी हा प्रयत्न आहे. हा फक्त धनादेश नाही तर महाराष्ट्राच्या साडे तेरा कोटी जनतेच्या या शुभेच्छा आहेत. माझी अशी अपेक्षा आहे की मराठी चित्रपटसृष्टीने अजून प्रगती करावी. जसे दक्षिणात्य भाषेचे चित्रपट हा मराठी मध्ये डबिंग करून दाखवले जातात तसे भविष्यात मराठी चित्रपट दक्षिणात्य व अन्य भाषेमध्ये डबिंग करून दाखवला गेले पाहिजेत. इतकेच नव्हे तर मराठी चित्रपटसृष्टीने सातासमुद्रापार जात जागतिक झेप घ्यावी अशी सर्व मराठी जनतेची अपेक्षा आहे. कारण भारतीय चित्रपटसृष्टीचा संस्थापकच मराठी होता आणि भारतीय चित्रपट सृष्टीची मुहुर्तमेठ या महाराष्ट्रातच रोवली गेली होती. म्हणूनच मराठी चित्रपट सृष्टीच्या प्रगतीसाठी शासन कटिबद्ध आहे असेही मंत्री श्री.मुनगंटीवार म्हणाले.

    यावेळी अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी सध्या सर्वच क्षेत्रात एआयचा वापर वाढला आहे, याकडे लक्ष वेधले. चित्रपट सृष्टीपुढे एयआयचे मोठे आव्हान आहे. मात्र एयआयच्या माध्यमातूनच मराठी चित्रपटसृष्टीने संपूर्ण देशात आणि देशाबाहेर जावे, असे ते म्हणाले. जीडीपीमध्ये मनोरंजन क्षेत्राचा ३% वाटा आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

    यावेळी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त तसेच अ दर्जा प्राप्त असलेल्या महिला दिग्दर्शकांच्या चित्रपटांना पाच लाख रुपये धनादेशचे वितरण करण्यात आले. तिचं शहर होणे या चित्रपटासाठी रसिका आगाशे, येरे येरे पावसासाठी शफक खान, बटरफ्लाय साठी मीरा वेलणकर, गिरकी या चित्रपटासाठी कविता दातीर यासह राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त वाळवी चित्रपटाला दुप्पट अनुदान देण्यात आले. या कार्यक्रमात 77 अ व ब वर्ग दर्जाच्या व तसेच प्रथमच समावेश केलेल्या क वर्गाच्या 21 चित्रपट निर्मात्यांना 29 कोटी 22 लाख रुपयांचे धनादेश वितरण करण्यात आले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email

    Related Posts

    लता दिदींच्या अजरामर गाण्यांचा ‘ मेरा साया साथ होगा’ हा सांस्कृतिक कार्यक्रमाचे स्वा. सावरकर सभागृह शिवाजी पार्क दादर मुंबई येथे आयोजन

    मराठी भाषेतील अभिजात सौंदर्य या विषयावर व्याख्यान – थेटभेट प्रवीण दवणे

    Kalyan श्री स्वामी सहजानंद चौक मंडळाचे नवरात्रोत्सवाचे 50वे वर्ष

    Leave A Reply Cancel Reply

    आमच्या संपर्कात रहा
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    • WhatsApp
    ताज्या बातम्या

    लता दिदींच्या अजरामर गाण्यांचा ‘ मेरा साया साथ होगा’ हा सांस्कृतिक कार्यक्रमाचे स्वा. सावरकर सभागृह शिवाजी पार्क दादर मुंबई येथे आयोजन

    लतादिदींच्या अजरामर गाण्यांची मैफल अनुभवता येणार मुंबई, दि. १० : सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने गानसम्राज्ञी…

    मराठी भाषेतील अभिजात सौंदर्य या विषयावर व्याख्यान – थेटभेट प्रवीण दवणे

    Kalyan श्री स्वामी सहजानंद चौक मंडळाचे नवरात्रोत्सवाचे 50वे वर्ष

    KDMC ऑन लाईन लेखी परिक्षा घेण्यात येणार असून राज्यातील 14 जिल्ह्यात त्याचे 25 केंद्रात नियोजन

    Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
    © 2025 Post Marathi Digital | All rights reserved.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.