पंढरपुर मंदिर परिसरासाठी १४०० कोटी व अनेक विकास योजना सोलापूरमध्ये तसेच पत्रकार गृह निर्माण सोसायटीला ७ कोटी निधीची तरतूद करणारे एकनाथ शिंदे एकमेव मुख्यमंत्री … गोऱ्हे
दि:६ ऑक्टोंबर : महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती तथा शिवसेना नेत्या नीलमताई गोऱ्हे तुळजापूर सोलापूर दौऱ्यावर असताना आज दुपारी सोलापूर शासकीय निवासस्थान येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत डॉ .गोऱ्हे यांनी संवाद साधला. सोलापूर येथून येत्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना पक्षाला व महायुतीला अधिकाधिक यश मिळेल असा विश्वास डॉ.गोऱ्हे यांनी व्यक्त केले.
लोकसभा निवडणुकीच्या काळात महाविकास आघाडी कडून दिशाभूल करणारी वक्तव्ये सामान्य माणसापर्यंत पोचवण्याचे दुष्पाप करण्यात आले होते त्या गोष्टीला सामान्य मतदार आता बळी पडणार नाही असा विश्वास देखील डॉ.गोऱ्हे यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर सोलापुरातील ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांना जसे वयाच्या 84 व्या वर्षी स्वातंत्रवीर सावरकर यांच्या योगदानाबद्दल साक्षात्कार झाला. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री लाडकी योजनांबद्दल जो अपप्रचार खासदार प्रणिती शिंदे ह्या करत आहेत त्यांना देखील कालांतराने एकनाथ शिंदे बद्दल साक्षात्कार होईल अशी खात्री मा.नीलमताई गोऱ्हे यांनी व्यक्त केली. लाडकी बहिण योजने मुळे राज्याच्या तिजोरीवर कुठलाही बोजा पडणार नाही राज्य सरकार च्या मागे देशातील मोदी सरकार भक्कम पणे उभे आहे
सोलापूर शिवसेना पक्षात अनेक मतभेद गटबाजी आहे असा अपप्रचार जाणून बुजून करण्यात येत होता त्याला मात्र आज नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत सर्व पदाधिकारी एकत्रितरित्या उपस्थित असल्याने या चर्चांना पूर्णविराम मिळाला असे मत सर्व पदाधिकारी यांनी देखील व्यक्त केले. या बैठकीत जिल्हाप्रमुख शिवाजी सावंत, मनीष काळजे, अमोल शिंदे व प्रवक्ता ज्योतीताई वाघमारे यांनी आपले विचार मांडले व संजय मशिलकर संपर्क प्रमुख यांनी सर्व पदाधिकारी एक विचाराने काम करतील असे मत मांडले व आभार मानले.
या वेळी शिवाजी सावंत सोलापूर संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे पाटील, दिलीप कोल्हे शहर समन्वय, मनोज शेजवाल शहर समन्वयक, उमेश गायकवाड, सागर शितोळे, महिला जिल्हाप्रमुख रवीना राठोड, मोबिना मुलानी, आरती बसवंत ,जयश्री पवार व इतर पदाधिकारी उपस्थित होते.