मुंबई, ता.27 मे 2025 मंत्रालयातील SC,ST,OBC राज्य मागासवर्गीय संघटनेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपली तेहतीस वर्षाची उज्वल परंपरा राखत महापुरुषांची संयुक्त जयंती उत्सव सहाव्या मजल्यावर साजरा केला.
या कार्यक्रमाला राज्यसरकाच्या प्रातिनिधिक सदस्य म्हणून मंत्री संजय सावकारे यांची प्रमुख उपस्थिती होती. राज्याचे मुख्य सचिव सुजाता सौनिक, समाज कल्याण विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे,आदिवासी समाज कल्याण विभागाचे सचिव विजय वाघमारे,इतिहास अभ्यासक डॉ.श्रीमंत कोकाटे,दैनिक सम्राट नीलिमा कांबळे, यांच्या सह या कार्यक्रमाला मंत्रालयातील विविध विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी हजेरी लावली.
शिवराय ते भिमराय ’ या महत्वपूर्ण विषयावर इतिहास अभ्यास डॉ.श्रीमंत कोकाटे यांनी मुक्त संवाद साधला.आताच्या परिस्थितीत युवा पिढी कडून सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीचे मंथन होण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
Mumbai Update शिवराय ते भिमराय @ इतिहास अभ्यासक डॉ.श्रीमंत कोकाटे
31 Views
