सन २०२४-२५ या वर्षाच्या अतिरिक्त अर्थसंकल्पावर कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार मा.श्री.विश्वनाथ भोईर साहेब यांनी आज विधानसभा सभागृहात अभ्यासपूर्ण भाषण करीत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना,लेक लाडकी योजना,मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना, मुख्यमंत्री बळीराजा सवलत योजना अशा विविध योजना घोषित करून महिलांनसह सर्व घटकांना दिलासा दिल्याने राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.अजितदादा पवार साहेब यांचे अभिनंदन करून आभार व्यक्त केले. त्याच प्रमाणे आगरी-कोळी समाजाच्या उन्नतीसाठी “आगरी-कोळी आर्थिक विकास महामंडळ” स्थापन करण्यात यावे तसेच कल्याण शहराच्या मध्य भागातून जाणाऱ्या वालधुनी नदीचे संवर्धन करावे, नदीतील गाळ काढावा व खोलीकरण करावे तसेच वालधुनी नदी तीरावरील परिसर स्वच्छ करून नदीचे सुशोभीकरण करावे जेणे करून परिसरातील भागात पुराचे पाणी शिरणार नाही अशी अभ्यासू मागणी केली.