शोषित पीडित वंचित आदिवासी समाजाचा रॅप सिंगर !
9 ऑगस्टच्या जागतिक आदिवासी दिवस दिना निमित्त मधुराने आपल्या रॅप गाण्यातून व्यवस्थेला म्हणजेच सरकारला थेट प्रश्न विचारलेत ! आमची नव्या पिढीतील पोरं आता पुस्तक वाचू शिकू लागली आहेत. व्यवस्थेला थेट जाब विचारू लागली आहेत.
कल्याणात आज जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून शंकरराव झुंझारराव चौकातून प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही आदिवासी समाजातील वेगवगेळ्या सामाजिक संस्था, मंडळे यांनी गौरव रॅली काढून आदिवासी बांधवांनी पारंपरिक वेशभूषेत नृत्य कला संस्कृतीचे दर्शन घडवले. या गौरव रॅलीत कॉलेज तरुणी रॅप सिंगर मधुरा घाणे यांची भेट झाली.

