कल्याण: खडकपाडा व्यापारी रहिवासी संघटना आणि तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वैद्यकीय शिबिराचा शेकडो नागरिकांनी लाभ घेतला. यावेळी रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते. यावेळी १००हुन अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करत आपली सामाजिक जबाबदारी बजावली. तसेच या शिबिरात सहभागी झालेल्या रुग्णांच्या ३१ प्रकारच्या शस्त्रक्रिया मोफत केल्या जाणार आहेत. हे शिबिर टीमवर्कमुळे यशस्वी झाल्याचे खडकपाडा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष व माजी नगरसेवक उमेश बोरगावकर यांनी सांगितले.

