शासनाच्या नगररचना विभागाने काढलेल्या 1987 च्या परिपत्रकाचा आधार घेत कल्याण डोंबिवली पालिकेचा 1988 सालातील प्रशासक आयुक्त शिवलिंग भोसले यांनी केलेला ठराव आहे. या बाबत राज्यातील इतर महापालिका शासनाचे संबंधित परिपत्रक नुसार वर्षात सहा दिवस मांस विक्री पशू हत्या र्निबध करीत असते.
त्यामुळे वर्षात सहा दिवस मांस विक्री,कसाई कत्तल खाने बंद केले जातात! या सहा दिवसात आपल्या स्वतंत्र दिनाचाही समावेश ! सोशल माध्यमात सक्रिय असलेल्या लोकल पत्रकारांच्या चुकांची ठिणगी राज्यात उमटली ! चिकन मटण शॉप 14 ऑगस्ट च्या मध्यरात्री 12 पासून तर 15 ऑगस्ट रोजी च्या रात्री 12 पर्यंत बंद राहणार ! चिकन मटण खाण्यावर अजिबात बंदी नाही !
14 ऑगस्ट रोजी दुपारी संध्याकाळी रात्री दुकान सुरू असे पर्यंत तुम्ही बिनधास्त चिकन मटण खरेदी करू शकता. रिजनल माध्यमांनी राज्य स्तरीय पक्षांनी पराचा कावळा केलाय. पालिका आयुक्त अभिनव गोयल यांना पत्रकार परिषद घ्यावी लागली.

