महानगरपालिकेचे नगररचना विभाग,मालमत्ता विभाग,प्रभाग कार्यालय,स्थानिक गुंड ,बिल्डर लॉबी यांच्या संयुक्त दादागिरी त्रस्त झालेल्या कल्याण पूर्वेतील तिसगाव नाक्या जवळ असलेल्या सहजीवन सोसायटीतील 230 कुटुंबानी गेल्या 24 तासांपासून पालिकेच्या समोर थेट ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. भूखंड माफिया पालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरून सर्वसामान्य लोकांना जीवे ठार मारण्याची धमकी देत असल्याचा आरोप इथल्या रहिवाश्यांनी केला आहे.या सहजीवन मध्ये तीन विंग असून सदनिका धारकांनी लाखो करोडो रुपये मोजून ही विकासक पप्पू डेव्हलपर्स ने सोसायटीतील प्रस्तावित मंजूर कामे पूर्ण केली नसल्याचा आरोप रहिवाश्यांनी केला आहे. अपूर्ण कामे असताना महापालिकेच्या नगररचना विभागाने भ्रष्टचार करून विकासकाला बांधकाम पूर्णत्वाचा दाखला कसा दिला असा सवाल सदनिका धारकांनी केला आहे. स्थानिक गावगुंड प्रभाकर गायकवाड यांच्या मुळे आमच्या जीवितास धोका असल्याचे सोसायटीतील रहिवाश्यांनी बोलताना सांगितले आहे. सहजीवन सोसायटीच्या समस्या बाबत लोकसभा निवडणुकीतील प्रचारा दरम्यान खासदार श्रीकांत शिंदे यांनी केवळ मतदान पुरते आश्वासन दिल्याचे काही सदस्यांनी सांगितले. आमच्या सोसायटीतील सदनिका धारकांकडून मनपा ला कोट्यवधी रुपयांचा कर प्राप्त होत असताना आम्हाला kdmc प्रशासाने झुलवत ठेवले असल्याचा आरोप आंदोलनकर्त्या करदात्या नागरिकांनी केला आहे. सहजीवन सोसायटी समस्यांचा पालिकेकडून अंतिम निकाल n लागल्यास आम्ही बेमुदत उपोषण सुरू करू असा निर्वाणीचा इशारा सोसायटीतील रहिवाश्यांनी दिला आहे.