सह्याद्री खोऱ्यातून प्रवास सुरू करून कल्याणच्या खाडीत मिसळणारी उल्हास नदी प्रदूषणाच्या 5 व्या क्रमांकात आहे. उल्हास नदीचं वाटोळं इथल्या सत्ताधारी नेत्यांनी अधिकाऱ्यांनी हातमिळवणी करून एकत्रितपणे केलं. नुसते कडक आश्वासन देऊन आंदोलनकर्त्यांची बोळवण केली. KDMC प्रशासन गंभीर असल्याचे नौटंकी केली. त्याच kdmc मुख्यालयात आता प्रतिनियुक्तीवर आलेले अधिकारी kdmc चे पाणी पीत नाही. जेव्हा पासून या उल्हास बचाव नदी धरणे आंदोलनाच्या हजारो क्लिप्स फोटो व्हायरल झालेत त्यांच्या सोबत उल्हास नदी पात्रात मिसळणारे मोठे नाले चे व्हिडिओ फूटेज वायरल झालेत. कल्याण डोंबिवली महापालिका याच ठिकाणाहून दोन उदंचन केंद्रातून जवळपास 400 MLD पाणी उचल करून जलशुद्धीकेंद्रात पाठवते. Kdmc च्या नाल्याचे आता अधिकाऱ्यांनीही धसका घेतलाय. तसे पालिका मुख्यालयातील दुसऱ्या माळ्यावर तसेच पालिका भवन येथील तळ मजल्यावर थंड पाण्याचे फ्रिज त्याच सोबत पाणी शुद्धीकरण यंत्र लावले आहेत. संपूर्ण मुख्यालय तेच पाणी पित आहे. परंतु शासनाकडून आलेले अधिकारी बिसलेरी पाण्यावर भरोसा ठेवतात. पालिका क्षेत्रातील लोकसंखेने 20 लाखाच्या पुढ मिडील क्लास अप्पर मिडल क्लास, करदाते नागरिकांना असे प्रदूषित पाणी पिण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. पिण्यासाठी ते 10 रुपयांची बिसलेरी दररोज खरेदी करू शकत नाही.