कल्याणाच्या पीडित तरुणी संदर्भात घटना क्रम समजून घ्या… पीडित तरुणी कुणाची मुलगी आहे ! कुणाची बहीण आहे ! 21 जुलै च्या संध्याकाळी कल्याण पूर्वेतील लहान मुलांचे डॉक्टर अनिकेत पालांडे याच्या दवाखान्यात काय घडले ! गोदी मीडियाच्या पिलावळीने TRP साठी सर्वात आधी या पीडित मुलीला एक माथेफिरू तरुणाने क्रूर रित्या मारहाण झाल्याची एक व्हिडिओ क्लिप रिजनल माध्यमात पाठवली. घटनेचे दृश्य विचलित करणारे होते. पीडित मुलीचे नाव तिचा चेहरा घटना क्रम घाईघाईत दाखवले गेले. आरोपी सराईत गुंड असल्याचे दाबले गेले. लहान मुलांच्या हॉस्पिटल मध्ये डॉक्टर कडून आपल्या कंपनीचे औषधे उपलब्ध करून देण्यासाठी संध्याकाळच्या वेळात मेडिकल फार्मा कंपनीचे प्रतिनिधी रांगेत होते. 6 वाजून 5 मिनिटांनी डॉक्टर दवाखान्यात आलेत. त्याआधी हॉस्पिटल मध्ये सर्वसाधारण तपासणी करिता रुग्णाचे नंबर लागले होते. त्यात झा आडनावाची महिला आपल्या कुटुंबासोबत तिथं उपचार तपासणीसाठी आलेली. डेक्स सांभाळनारी पीडित तरुणी रजिस्टर मेंटेन्स करून रुग्णाची माहिती डॉक्टर पालांडे यांना देत होती. डॉक्टरांच्या सूचनांचे पालन करत ती दवाखान्यात असलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांशी बोलत होती. गेल्या दोन अडीच वर्षापासून ती या हॉस्पिटलमध्ये काम करते. झा कुटुंबासोबत गोकुळ नावाच्या संबंधिताने डॉक्टरशी भेटायचा तगादा लावला. डेक्स सांभाळणाऱ्या पीडिताने त्याला थांबवले. तरीही त्याची हुज्जत शिवीगाळ सुरू होती. त्यावर पीडिता ने त्याच्या कुटुंबीयाना सांगितले याला दवाखान्यातून बाहेर जायला सांगा. याचा राग मनात धरून गोकुळ झा या सराईत गुन्हेगाराने दवाखान्यात पुन्हा प्रवेश करत पीडित हिच्या टेबलावर अंगावर लाथ मारत पेपर उडवले. शिवीगाळ करत असल्यामुळे त्याच्या कुटुंबियाने त्याला पुन्हा बाहेर केलं होते. या अकास्मिक घटनेने व्यथित होऊन पीडित तरुणी ने बाहेर येत सेल्फ डिफेन्स साठी हॉस्पिटल मध्ये असलेल्या झा नावाच्या महिलेला जाब विचारत एक चापट मारली. याच वेळी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला गोकुळ झा हा सराईत आरोपी थेट पीडित तरुणीचा जीव घेण्याच्या हेतूने तिचे केश हातात धरून तिच्या छातीवर लाथेने जोरदार प्रहार करत तिला जमिनीवर आपटले. दवाखान्यात असलेल्या एकाही अन्य रुग्णाच्या नातेवाईकाने पीडित हिचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. हॉस्पिटल मध्ये लागलेल्या सी सी कॅमेऱ्यात हा सगळा प्रकार कैद झाला आहे. गोदी मीडियाच्या शिलेदारांनी पीडित तरुणीचे दुसऱ्या टप्प्यातील रिऍक्शन सी.सी. फुटेज चालवून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आरोपीला सॉफ्ट कॉर्नर दाखवण्याचा केविलवाणा अयशस्वी प्रयत्न केलाय. सराईत गोकुळ झा त्याचा भाऊ रणजीत झा रवी रेड्डी हे त्रिकुट नांदिवली आडवली ढोकळी परिसरात एका स्थानिक लोकल समाजसेवकांच्या मदतीने लोकल फेरीवाला हातगाडी वाले यांच्याकडून हप्ते वसूल करतात अशी माहिती समोर आली आहे. त्यांच्या विरुद्ध वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल असूनही ते मोकाट होते. 21 जुलै च्या संध्याकाळ पासून हा सराईत आरोपी भूमिगत झाला होता.दुसऱ्या दिवशी रात्री उशिरा मनसेच्या युवा कार्यकर्त्यांनी त्याला नेवाली परिसरातून पोलिसांना पकडून दिले. त्यातही खरा ट्विस्ट अजून वेगळा आहे. गोदी ने हा ट्विस्ट उघड केला नाही. गोदी मीडियाने सत्ताधारी नेत्यांच्या इशाऱ्याने एका पीडित तरुणीवर आणखी मानसिक आघात होईल असे कृत्य केलं आहे. पीडित तरुणीचे वकील पत्र घेणारे अँड.हरीश नायर, पीडित तरुणीची मोठी बहीण, पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांची प्रतिक्रिया बघा…सविस्तर व्हिडिओ लिंक मध्ये आहे…

