प्रभाग ९ आय पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी दिला इशारा
कल्याण ग्रामीण – यंदाचा पावसाळा राज्यातील धरण पानवत परिसरासाठी अतिशय चांगला गेला असला तरीही कल्याण डोंबिवली पालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून पाणी पुरवठा संदर्भात कुठलाही आदेश नसताना कल्याण पूर्वेतील नागरीकांच्या घरात पाणी का पोहचत नाही ? असा थेट सवाल उपस्थित करीत प्रभाग ९ आय च्या पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना जाब विचारत शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी या अधिकाऱ्यांना निर्वाणीचा इशारा दिला आहे.येत्या दोन दिवसात पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही तर खुर्चीवर बसू देणार नाही !
142 कल्याण ग्रामिण भागात असलेल्या नांदिवली , चिंचपाडा , कैलाशनगर , आशेळे , माणेरे या गावातील रहिवाशी गेली अनेक दिवस पिण्याच्या पाणी पुरवठ्यातील अनियमित आणि कमी दाबाच्या पुरवठ्यामुळे त्रस्त झाले आहेत.या भागातील वाढत्या लोकसंख्येमुळे महापालिकेच्या तिजोरीत कर वसुली जबर आहे.तरीसुद्धा पालिका प्रशासन या गावातील रहिवाश्यांना योग्य तशा नागरी सुविधा देत नाहीत.या गावातील पाणी पुरवठ्याची समस्या गेली अनेक महिने गंभीर झाली आहे , याचा जाब विचारण्यासाठी गुरुवारी दुपारी शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग ९ आय कार्यालयावर हंडा – कळशी घेवून हजारो त्रस्त महिलांनी मोर्चा काढून कार्यालयावर धडक देत पालिक अधिकाऱ्यांचा निषेध केला .
या समयी उपस्थित अधिकाऱ्यांना शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांचा रुद्रावतार पहावयास मिळाला . महेश गायकवाड यांनी या अधिकाऱ्यांना शेवटचा अल्टीमेट देत इशारा दिला आहे की येत्या दोन दिवसात पाणी पुरवठा निर्धारीत वेळेत आणि योग्य दाबाने पाणी पुरवठा झाला पाहिजे , अन्यथा या खुर्चीवर बसु देणार नाही .
उपस्थित अधिकाऱ्यांनी सदर गावात होणाऱ्या पाणी पुरवठ्यातील दोष शोधुन तो दुर करण्यात येईल व पाणी पुरवठा व्यवस्थित व मुबलक प्रमाणात कसा करता येईल याचे योग्य ते नियोजन करण्यात येईल .
या समयी उपशहर प्रमुख प्रशांत बोटे , महिला उपशहर संघटक वैशाली ठाकूर , तरेच मीना मुठे , शहीन मुल्ला , सुजाता शिंदे , शाखा प्रमुख संतोष माने , विजोश भोईर , चंद्रसेन सोनावणे , विवेक त्रिवेदी , प्रशांत अमीन , रितेश राजपूत , अजय गायकवाड , विजोष भोईर आदी कार्यकर्ते आणि शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते .

