कल्याणात रिक्षा चालकांचे श्रमदान ! पालिका प्रशासक सुस्त ! लोकांसाठी रिक्षा चालक रस्त्यावर !
लोकांच्या जीवाची काळजी म्हणून रिक्षा चालकांनी श्रम दान करत कल्याण सुभाष चौक ते अशोक नगर वालधुनी रस्त्यावरचे खड्डे भरले ! वाहतूक पोलिस ही मदतीला आले !
रिक्षा चालक मालक असो चे स्टेन्ड प्रमुख अनिल जगताप यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने प्रत्यक्षात खड्डे भरले. रिक्षा चालकांना प्रवाश्यांना मदत व्हावी म्हणून हा उपक्रम केला.
कुंभकर्णी झोपेत असलेल्या पालिकेच्या प्रशासकाला सामान्य नागरिकांचा दणका ! खड्ड्यांमुळे लोकांचे जीव धोक्यात ! मणक्याच्या आजाराने लोक हैराण !