ठाणे खंडणी विरोधी पथकाची कारवाई ! सुरेंद्र पांडुरंग पाटील याला नाशिकच्या आलिशान हॉटेल मधून सापळा रचून ताब्यात घेतलं. खंडणी विरोधी पथकाचे प्रमुख सहायक आयुक्त शेखर बागडे यांच्या पथकाची कारवाई ! सुरेंद्र पाटील सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळखी करून महिलांची फसवणूक करून त्यांचे निवस्त्र व्हिडिओ काढून विकृत चाळे करत त्यांना त्रास द्यायचा. या बाबत डोंबिवलीतील मानपाडा टिळकनगर या दोन पोलिस ठाण्यात त्याच्या कुकर्माचे गुन्हे दाखल झाले आहेत. नाशिक येथील सेलिब्रेशन हॉटेल मधून ताब्यात घेतले.

