डोंबिवली ( शंकर जाधव ) पुस्तकी ज्ञानाबरोबर शिकविलेल्या अभ्यासाचा प्रत्यक्ष अनुभव मिळणे आवश्यक आहेत.येथील लोकमान्य गुरुकुल शाळेने विद्यार्थ्यांना भात शेती कशी करतात याचे शिक्षण देत असताना प्रत्यक्ष शेती करण्याचा अनुभव करून दिली. दावडी गावात भातशेती व भात लागवड कशी होते हे विद्यार्थ्यांनी अनुभवले.इतकेच नाही तर शेतामध्ये विद्यार्थिनींनी नांगरही हातात धरला.
विद्यार्थ्यांना शेती म्हणजे काय? शेतात शेतकऱ्यांना किती काम करावे लागते? शेतकरी किती मेहनत घेतात? ऊन, वारा, पाऊस यामध्ये सुद्धा शेतकरी कसे कष्ट करतात? याचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना यावा म्हणून त्यांना शेतात भाताची लागवड करण्यासाठी नेले जाते.याही वर्षी विद्यार्थ्यांना दावडी येथे भातशेती दाखवण्यासाठी व भात लागवड करण्यासाठी नेण्यात आले होते. भात शेतीत चिखल किती असावा लागतो? भातशेतीला पाणी किती लागते? चिखलाने हात पाय कपडे माखतात याचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांनी भाताची लागवड करून घेतला.एवढेच नव्हे तर शेतामध्ये विद्यार्थिनींनी नांगरही धरला होता.
आवणीतून किंवा वाफ्यातून भाताची रोपे काढून दुसरीकडे लावण्याचा अनुभव या क्षेत्रभेटीत विद्यार्थांना देण्यात आला.शेतकरी दिवसभर कष्ट करतो तेव्हा आपल्याला धान्य मिळते यांचा अनुभव आला. भाताची शेती लोकमान्य गुरुकुलाचे शिक्षक मंगेश गायकर यांची आहे. विद्यार्थ्यांसोबत त्यांचे वर्गशिक्षक राजश्री बडवे, सायली फणसे, व्यंकटेश प्रभुदेसाई, सारिका लोखंडे, भरत साळवी , विजय दीक्षित व मंगेश गायकर इत्यादी शिक्षकांनी भात लागवडीचा प्रत्यक्ष अनुभव शेतात काम करून घेतला. मुख्याध्यापिका श्रीमती अर्चना पावडे यांनी शिक्षकांचे कौतुक करत शेती करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही शाबासकी दिली.