बीएमसी पी नॉर्थ वार्ड आणि कलेक्टरची संयुक्त कारवाई; डीएमसी भाग्यश्री कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली धडक मोहीम
मुंबईतील मार्वे पठारे वाडी परिसरात बेकायदा बांधकामाविरोधात मोठी कारवाई करत बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) पी नॉर्थ वार्ड आणि कलेक्टर कार्यालयाच्या संयुक्त पथकाने 23 बेकायदा गोदामांवर बुलडोझर चालवला. या कारवाईत सुमारे 25 हजार चौरस फूट सरकारी व खासगी जमीन मोकळी करण्यात आली.
ही गोदामे शूटिंग व लग्न समारंभातील साहित्य साठवण्यासाठी उभारण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. जॉन 4 च्या डीएमसी भाग्यश्री कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली पी नॉर्थ वार्डचे सहाय्यक आयुक्त कुंदन वलवी आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी गणेश मिसाल यांच्या उपस्थितीत कारवाई पार पडली.
सहाय्यक अभियंता राजेश सोनावने आणि उपअभियंता सुहास घोलप यांच्या पथकाने ही मोहीम राबवली. कारवाईदरम्यान 2 जेसीबी, 16 अधिकारी आणि 30 कामगार तैनात होते. सर्व बेकायदा गोदामे जमीनदोस्त करण्यात आली.
डीएमसी भाग्यश्री कापसे यांनी स्पष्ट केले की मुंबईत कोणतेही बेकायदा बांधकाम सहन केले जाणार नाही. अशा कारवाया पुढेही सुरू राहणार आहेत.
Mumbai,
Post Marathi Digital

