Close Menu
    अधिक वाचा

    थेटभेट आदिवासींच्या हक्कासाठी लढणारे ॲड राजेंद्र मरासकोल्हे अधिसंख्यांची गडबड

    मार्वे पठारे वाडीत 23 बेकायदा गोदामांवर बुलडोझर, 25 हजार चौरस फूट जागा मोकळी

    29 महापालिकेसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान

    Kalyan Dombivali जागतिक दिव्यांग दिवस निमित्त दिव्यांग बांधवांची रॅली

    Facebook X (Twitter) Instagram
    Post Marathi DigitalPost Marathi Digital
    Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
    • मुख्य पान
    • बातम्या
    • 36 जिल्हे विशेष घडामोडी
    • बोला नगरसेवक
    • महापालिका विशेष बातम्या
    • राजकीय कट्टा
    • अभिव्यक्ती स्वातंत्र्य
    Post Marathi DigitalPost Marathi Digital
    Home»News»“आकांक्षा पुढती जिथे गगन ठेंगणे”: कल्याणच्या कचरावेचक कुटूंबातील 5 विद्यार्थ्यांचे दहावी परीक्षेत घवघवीत यश

    “आकांक्षा पुढती जिथे गगन ठेंगणे”: कल्याणच्या कचरावेचक कुटूंबातील 5 विद्यार्थ्यांचे दहावी परीक्षेत घवघवीत यश

    1 Views
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    कल्याण दि.13 मे :
    कल्याणच्या डम्पिंग ग्राऊंडवर काम करणाऱ्या पूर्वाश्रमीच्या कचरावेचक कुटुंबातील 5 विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवत मुख्य प्रवाहाच्या दिशेने मोठी झेप घेतली आहे. गौरी सोनवणे (63 टक्के), श्रद्धा सोनवणे (65 टक्के), अर्चना घुले (51टक्के), कुणाल उकांडे (60 टक्के) आणि दीपक जगताप (46 टक्के) अशी या पाच विद्यार्थ्यांची नावे आहेत. या मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गेल्या एक दशकांहून अधिक काळ मेहनत घेणाऱ्या अनुबंध संस्थेशी हे विद्यार्थी जोडले गेले आहेत.

    पूर्वापार चालत आलेली घरची अत्यंत हलाखीची परिस्थिती. शिक्षण तर दूर साधे एकवेळचे जेवणही मिळवण्यासाठी प्रचंड संघर्ष अशी भयानक परिस्थिती असतानाही या मुलांनी मिळवलेले हे गुण म्हणजे 100 टक्क्यांहून अधिक सरसच. एकीकडे आपण समाजात पाहतो की आपल्या मुलासाठी आई वडील काय हवं, काय नको, चांगली शाळा, चांगला क्लास असं सगळं काही देण्याचा प्रयत्न करतात.

    तर दुसरीकडे या पूर्वाश्रमीच्या कचरावेचक मुलांच्या घरची एकदम त्याउलट परिस्थिती. मुलाला काही तरी देण्याची इच्छा असूनही पोटाच्या भुकेपुढे आपल्या पोटच्या गोळ्याकडे त्यांना नाईलजातव दुर्लक्ष करावं लागतं. मात्र या गोष्टीचं कोणतेही भांडवल न करता या पाच विद्यार्थ्यांनी जबरदस्त इच्छाशक्तीच्या जोरावर आज हे यश प्राप्त केलं आहे. यातील काही मुलांचे पालक हे सध्या घरकाम आणि घंटागाडीवर काम करत असल्याचे अनुबंध संस्थेकडून सांगण्यात आले.

    मुख्य प्रवाहात येण्यासाठी, मुख्य प्रवाहात जोडलं जाण्यासाठी त्यांचे हे पहिलेच पाऊल. त्याबद्दल गौरी सोनवणे (63 टक्के), श्रद्धा सोनवणे (65 टक्के), अर्चना घुले (51टक्के), कुणाल उकांडे (60 टक्के) आणि दीपक जगताप (46 टक्के) या पाचही जणांचे करावे तितके कौतुक कमीच ठरेल. या पाचही जणांच्या जिद्दीला आणि त्यांच्या मनामध्ये ही जिद्द निर्माण करणाऱ्या अनुबंध संस्थेला मनापासून सलाम…

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email

    Related Posts

    थेटभेट आदिवासींच्या हक्कासाठी लढणारे ॲड राजेंद्र मरासकोल्हे अधिसंख्यांची गडबड

    मार्वे पठारे वाडीत 23 बेकायदा गोदामांवर बुलडोझर, 25 हजार चौरस फूट जागा मोकळी

    29 महापालिकेसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान

    Leave A Reply Cancel Reply

    आमच्या संपर्कात रहा
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    • WhatsApp
    ताज्या बातम्या

    थेटभेट आदिवासींच्या हक्कासाठी लढणारे ॲड राजेंद्र मरासकोल्हे अधिसंख्यांची गडबड

    मार्वे पठारे वाडीत 23 बेकायदा गोदामांवर बुलडोझर, 25 हजार चौरस फूट जागा मोकळी

    29 महापालिकेसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान

    Kalyan Dombivali जागतिक दिव्यांग दिवस निमित्त दिव्यांग बांधवांची रॅली

    Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
    © 2026 Post Marathi Digital | All rights reserved.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.