Close Menu
    अधिक वाचा

    थेटभेट आदिवासींच्या हक्कासाठी लढणारे ॲड राजेंद्र मरासकोल्हे अधिसंख्यांची गडबड

    मार्वे पठारे वाडीत 23 बेकायदा गोदामांवर बुलडोझर, 25 हजार चौरस फूट जागा मोकळी

    29 महापालिकेसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान

    Kalyan Dombivali जागतिक दिव्यांग दिवस निमित्त दिव्यांग बांधवांची रॅली

    Facebook X (Twitter) Instagram
    Post Marathi DigitalPost Marathi Digital
    Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
    • मुख्य पान
    • बातम्या
    • 36 जिल्हे विशेष घडामोडी
    • बोला नगरसेवक
    • महापालिका विशेष बातम्या
    • राजकीय कट्टा
    • अभिव्यक्ती स्वातंत्र्य
    Post Marathi DigitalPost Marathi Digital
    Home»News»महाराष्ट्र चित्रपट,रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या उपाध्यक्ष पदी श्री.विठ्ठल राठोड यांची नियुक्ती

    महाराष्ट्र चित्रपट,रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या उपाध्यक्ष पदी श्री.विठ्ठल राठोड यांची नियुक्ती

    1 Views
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    महामंडळाच्या उत्पन्नवाढीवर भर देणार – उपाध्यक्ष श्री.विठ्ठल राठोड यांचे प्रतिपादन

    मुंबई दि. १: महाराष्ट्र चित्रपट,रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या उपाध्यक्ष पदी श्री.विठ्ठल राठोड यांची शासनाने नियुक्ती केली आहे. त्यांनी आज पदाचा पदभार स्वीकारला. याप्रसंगी दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्नशील राहणार असून आंतरराष्ट्रीय स्तरावरील निर्मितीसंस्था महामंडळाच्या जागेवर चित्रीकरणासाठी आनंदाने येतील अशा प्रकारच्या सोई-सुविधा येथे उपलब्ध करण्यावर आगामी काळात भर देणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

    दरम्यान महामंडळाच्या बैठक हॉलमध्ये सह व्यवस्थापकीय संचालक डॉ.धनंजय सावळकर यांनी त्यांचे स्वागत करून अभिनंदन केले. यावेळी महामंडळाचे आजी-माजी अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते. तसेच श्री. राठोड यांचे कुटुंबिय-नातेवाईक, मित्र परिवारही यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होता.

    पुढे संवाद साधतांना श्री. राठोड म्हणाले की, येथील अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या मेहनतीमुळे सध्या हे महामंडळ नफ्यात काम करत आहे. त्यामुळे महामंडळाच्या कर्मचारीवर्गाचे प्रलंबित असणारे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे. बदलत्या काळाबरोबर चित्रनगरीचा पुनर्विकास होणे गरजेचा असून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जागतिक दर्जाची चित्रनगरी निर्माण होणे महत्वाचे आहे. त्यासाठी येथे चित्रीकरण संख्या वाढवून उत्पन्नात वाढ करण्याची गरज असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी महामंडळातील अधिकारी- कर्मचारी यांनी देखील यथोचित भावना व्यक्त केल्या.
    ——————————–
    @जनसंपर्क विभाग
    दादासाहेब फाळके चित्रनगरी

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email

    Related Posts

    थेटभेट आदिवासींच्या हक्कासाठी लढणारे ॲड राजेंद्र मरासकोल्हे अधिसंख्यांची गडबड

    मार्वे पठारे वाडीत 23 बेकायदा गोदामांवर बुलडोझर, 25 हजार चौरस फूट जागा मोकळी

    29 महापालिकेसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान

    Leave A Reply Cancel Reply

    आमच्या संपर्कात रहा
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    • WhatsApp
    ताज्या बातम्या

    थेटभेट आदिवासींच्या हक्कासाठी लढणारे ॲड राजेंद्र मरासकोल्हे अधिसंख्यांची गडबड

    मार्वे पठारे वाडीत 23 बेकायदा गोदामांवर बुलडोझर, 25 हजार चौरस फूट जागा मोकळी

    29 महापालिकेसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान

    Kalyan Dombivali जागतिक दिव्यांग दिवस निमित्त दिव्यांग बांधवांची रॅली

    Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
    © 2026 Post Marathi Digital | All rights reserved.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.