पाचोरा तालुक्यातील लोहटार शेत शिवारातील गोडाऊन मध्ये ठेवलेल्या 50 ते 60 क्विंटल कपाशीला मध्यरात्री अचानक आग, लागलेल्या आगीला विझवण्याचे शर्तीचे अग्निशमन दलाचे कर्मचारी फिरोज खान अनिल बागुल दीपक पाटील राजू भोसले हे करीत आहेत.
पाचोरा शहराजवळच असलेल्या लोटार या गावातील शेतकरी संजय श्रीमंत पाटील यांचे गावानजीकच असलेल्या शेतशिवारातील शेतात बांधलेल्या गोडाऊन मध्ये उत्पन्न आलेली 50 ते 60 कपाशी ठेवलेली होती, दिनांक पाच एप्रिल च्या मध्यरात्री अचानक आग लागली, सकाळी सात वाजेच्या सुमारास शेतकरी शेत शिवारातील या गोडाऊन जवळ पोहोचला असता त्याच्यातील निदर्शनास आली, शेतकरी संजय पाटील यांनी तात्काळ अग्निशमन बॉम्बस या बाबतची माहिती देताच अग्निशमन बंबा सह कर्मचारी घटनेस्थळी दाखल झालेले असून आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न करीत आहेत, मात्र यात संपूर्ण कपाशी जळून खाक झाल्याची दिसून येत आहे, शेतकऱ्यास मोठ्या आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागणार आहे, तरी झालेली नुकसान भरपाई मिळावी अशी अपेक्षा शेतकऱ्याने व्यक्त केली आहे, तरी पंचनाम्या अंतिम किती नुकसान झाले याबाबतची सविस्तर माहिती मिळू शकेल.