Close Menu
    अधिक वाचा

    बिर्ला महाविद्यालयाची पारंपरिक ज्ञान दिंडी ! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची हजेरी

    ठाकरे बंधू मनोमिलन थेटभेट – ज्येष्ठ पत्रकार विवेक कांबळे

    KDMC नगररचना विभागातील बोके ! आयुक्त गोयल हटवू शकत नाही !

    Retired sanitation worker meets Municipal Commissioner Abhinav Goyal on Lokshahi Din

    Facebook X (Twitter) Instagram
    Post Marathi DigitalPost Marathi Digital
    Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
    • मुख्य पान
    • बातम्या
    • 36 जिल्हे विशेष घडामोडी
    • बोला नगरसेवक
    • महापालिका विशेष बातम्या
    • राजकीय कट्टा
    • अभिव्यक्ती स्वातंत्र्य
    Post Marathi DigitalPost Marathi Digital
    Home»News»उन्हामुळे तहानलेला मुलगा पाणी आणण्यासाठी गेला अन् परत आलाच नाही, पोलीसांनी झोपडपट्टीतील प्रत्येक घराची केली तपासणी

    उन्हामुळे तहानलेला मुलगा पाणी आणण्यासाठी गेला अन् परत आलाच नाही, पोलीसांनी झोपडपट्टीतील प्रत्येक घराची केली तपासणी

    5 Views
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पोलीसांनी रात्रदिवस फिरुन घेतला शेतमजुराच्या मुलाचा शोध….

    पंढरपूर : गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील एका शेतात काम करणाऱ्या मुजरांचा उन्हामुळे तहानलेला मुलगा पाणी आणण्यासाठी २१ एप्रिल रोजी गेला आणी रात्रभर दुसऱ्या दिवशी दिवसभर घरी आलाच नाही. त्याला पोलीसांनी शोधून गोरगरीब आई वडीलांच्या ताब्यात दिले आहे. हरवलेल्या मुलाचे नाव यश पांडुरंग हेगडे (वय ८) असे आहे.

    निशा हेगडे व पांडूरंग हेगडे हे दोघेजन मिळेल ते काम करून कुटूंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांना यश (वय ८) व मुलगी सोनाली हे दोन मुले आहेत. गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील बबन शिरगिरे यांच्या शेतात कामासाठी पती पत्नी आपल्या मुलांना घेवून गेले होते. त्यांनी मुलांना जवळच्या विटभट्टीवर पिण्यासाठी पाणी आणण्यास पाठवले. काही वेळाने फक्त सोनालीच पाणी घेवून आली. आई वडीलांना वाटले मुलगा तेथे मुलांसोबत खेळत असेल. म्हणून दोघांनी काम चालूच ठेवले. परंतू मुलगा यश हा परत आलाच नाही. म्हणून दोघांनी विटभट्टीवर जावून चौकशी केली असता मुलगा तेथे मिळून आला नाही. त्यांनी याबाबत पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. मुलगा लहान असल्याने वरीष्ठ पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांनी तात्काळ यंत्रणा कामाला लावली.

    विविध ठिकाणी पोलीस पथके पाठविली, सर्वत्र मुलाची शोधा शोध केली. तसेच त्या भागातील सीसीटीव्ही चित्रीकरण प्राप्त केले. त्यामध्ये मुलगा झोपडपट्टीकडे चालत जात असताना दिसला. पोलीसांनी मुलाचा फोटो दाखवत झोपडपट्टीतील सर्व घरांची तपासणी केली, तरही त्या मुलाचा शोध लागत नाही. त्यानंतरही २२ एप्रिल रोजी पोनि मुजावर यांनी रात्रभर यशला शोधण्यासाठी योजना आखली. दुसरे दिवशी स्वतः व निवडक अधिकारी व अंमलदार यांना कामाला लावले. अखेर पंढरपूरच्या चंद्रभागा नदीपात्रात नाव चालवणारे नावाडे यांचेकडे चौकशी करता या वर्णनाचा मुलगा महाद्वार घाटासमोरील मंदीराजवळ झोपला असल्याची माहिती मिळाली. त्या ठिकाणी पोलीसांनी मुलाच्या आई वडीलांसह जावून मुलाचा शोध घेतला तेथे मुलगा यश हा झोपत मिळून आला. तेव्हा कुठे पोलीस व आई वडीलांनी श्वास घेतला.

    ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अतिरीक्त पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. तयुब मुजावर, सपोनि. विभावरी रेळेकर, चालक नदाफ यांनी केली आहे.

    फोटो : गोरगरीब शेतमजुराचा हरवलेला लहान मुलाला शोधण्यासाठी सर्व यंत्रणाकामी लावून त्याला शोधून काढून प्रेमाने खाऊ देताना वरीष्ठ पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर. (छाया – सचिन कांबळे)

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email

    Related Posts

    बिर्ला महाविद्यालयाची पारंपरिक ज्ञान दिंडी ! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची हजेरी

    ठाकरे बंधू मनोमिलन थेटभेट – ज्येष्ठ पत्रकार विवेक कांबळे

    KDMC नगररचना विभागातील बोके ! आयुक्त गोयल हटवू शकत नाही !

    Leave A Reply Cancel Reply

    आमच्या संपर्कात रहा
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    • WhatsApp
    ताज्या बातम्या

    बिर्ला महाविद्यालयाची पारंपरिक ज्ञान दिंडी ! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची हजेरी

    ठाकरे बंधू मनोमिलन थेटभेट – ज्येष्ठ पत्रकार विवेक कांबळे

    KDMC नगररचना विभागातील बोके ! आयुक्त गोयल हटवू शकत नाही !

    Retired sanitation worker meets Municipal Commissioner Abhinav Goyal on Lokshahi Din

    Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
    © 2025 Post Marathi Digital | All rights reserved.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.