Close Menu
    अधिक वाचा

    KDMC मुख्यालयात नगररचना विभाग गडबड घोटाळा ! फाईली मुख्यालय बाहेर !

    MNS Kalyan आंदोलन धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या ! कार्यकर्त्यांनी प्रधान यांचे पोस्टर काळे केलं !

    कल्याण डोंबिवलीत मुसळधार पावसाचा राडा ! नागरिकांचे हाल !

    Dombivali KHAMBALPADA MURDER CASE सिस्टिमचा बळी प्रताप चौधरी

    Facebook X (Twitter) Instagram
    Post Marathi DigitalPost Marathi Digital
    Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
    • मुख्य पान
    • बातम्या
    • 36 जिल्हे विशेष घडामोडी
    • बोला नगरसेवक
    • महापालिका विशेष बातम्या
    • राजकीय कट्टा
    • अभिव्यक्ती स्वातंत्र्य
    Post Marathi DigitalPost Marathi Digital
    Home»News»कल्याण डोंबिवली महापालिकेचा वर्धापान दिन सोहळा थाटामाटात साजरा

    कल्याण डोंबिवली महापालिकेचा वर्धापान दिन सोहळा थाटामाटात साजरा

    12 Views
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जुळ्या शहरांची महापालिका 43 वर्षाची झाली. या शहराचे कौतुकच भारी आहे. कल्याण शहराला इतिहासात वारसा आहे. अशा शहरात महापुरुषांच्या नावाचा जागर होणे नवे नाही. पण हा जागर महापालिकेने घडवून आणणे हे नवे घडले आहे.

    एप्रिल महिन्यात रुजू झालेले तरुण आयुक्त भा. प्र. से. अभिनव गोयल यांच्या प्रत्येक निर्णयात प्रशासन खडबडून जागे झालं आहे. त्या ताकदीने त्या जोडीने इतर अधिकारी वर्ग ऍक्टिव्ह मोड मध्ये आला आहे.

    महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची बिकट अवस्था बघून पालिकेने 2 ऑक्टोबरचा नियोजित कार्यक्रम पुढे केला..अवकाळी पावसामुळे राज्यावर दुष्काळी संकट आले. म्हणूनच पालिकेने वर्धापान दिनाचा कार्यक्रम 30 ऑक्टंबर रोजी साजरा करण्याचा निर्णय घेतला.
    आज आचार्य अत्रे नाट्यगृहात मोठ्या दिमाखात हा कार्यक्रम दोन राजांची थीम घेऊन यशस्वी झाला.

    एक राजा छत्रपती शिवाजी महाराज दुसरा ज्ञानाचा राजा विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर.

    या दोन्ही महापुरुषांच्या सोबत इतरही दिग्गज नेत्यांना स्वतंत्र सेनानी ना काव्यातून गाण्यातील सुरांनी आठवणीत आणले.
    कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रत्येक विभागातील सर्व सामान्य कर्मचारी पासून तर क्लासवन अधिकाऱ्यांनी आजच्या या कार्यक्रमात सह परिवार ताकदीने सहभाग घेतला.

    पालिकेचे चीफ ऑडिटर सुरेश बनसोडे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या आजच्या या कार्यक्रमाने अत्रे रंगमंदिरात तीन तास अधिकारी कर्मचारी पत्रकार रसिक यांना खिळवून ठेवले. पालिकेचे आयुक्त अभिनव गोयल शेवट पर्यंत या कार्यक्रमात हजर राहिले.

    दोन टप्प्यातील या कार्यक्रमाचा प्रारंभ गणेश वंदन,देश भक्तीपर हिंदी जुन्या गाण्याने सुरू झाला. पहिल्या टप्प्यात बाबासाहेबांचा संघर्ष उलगडा मोठ्या खुबीने करण्यात तर दुसऱ्या टप्प्यात स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनपटाला उलगडण्यात आले. अगदी वेशभूषा अभिनयाने दमदार संगीत नेपथ्य घेऊन शिव राज्याभिषेक सोहळ्याने अंतिम टप्प्यात डोळ्याचे पारणे फेडले.

    या कार्यक्रमांत अभिनय साकारणारे सगळेच महापालिकेच्या वेगवगेळ्या विभागातील पुरुष महिला कर्मचारी बंधू भगिनींनी जीव ओतून कमी वेळात सराव करत हा कार्यक्रम यशस्वी केला.अजून खूप काही लिहिता येईल.

    या सुरेख दिमाखदार कार्यक्रमाला अप्पर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ, उपआयुक्त वंदना गुळवे, उपआयुक्त संजय जाधव, उपायुक्त रामदास कोकरे, उपायुक्त कांचन गायकवाड,सचिव किशोर शेळके, शहर अभियंता अनिता परदेशी, सहायक संचालक संतोष डोईफोडे, अतिरिक शहर अभियंता जगदीश कोरे यांच्या सह पालिकेचे सर्व सहायक आयुक्त,आचार्य अत्रे नाटयगृहाचे माणिक शिंदे,स्टेज लाईट ऑडिओ बघणारे सुरेश पवार,राहूल चव्हाण, फोटोग्राफी करणारी पालेकीची टीम ज्यांनी हा कार्यक्रम ऑनलाइन लाईव्ह ठेवला होता त्या सगळ्यांचे कौतुक आहे. सामान्य प्रशासन विभागातील शशी महाले यांच्याकडे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सोबत मेघडेंबरी घेऊन उभे राहण्याची जबाबदारी होती.तिचे स्क्रू ढिले होते त्यात मोठी कसरत करून शशीने शेवट पर्यंत ती छत्री (मेघडेंबरी) पडू दिली नाही.

    सूत्रसंचालन करणारे देशपांडे यांनी कार्यक्रमाचा सिक्वेन्स सोडला नाही. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने कार्यक्रम संपन्न झाला..
    विशेष म्हणजे कंटाळवाणा प्रकार होऊ नये म्हणून गणेश उत्सव मंडळांना यंदाच्या स्पर्धेचे पुरस्कार सन्मानचिन्ह,पारितोषिक प्रारंभीच वितरित केले गेले. त्यातही आयुक्त गोयल यांनी एक एक पारितोषिक इतर उपआयुक अधिकारी यांच्या हस्ते देण्याचे निश्चित केलं.भरल्या स्टेज वर असे निर्णय घेणे मोठ्या व्हिजन माईंड चे लक्षण आहे. महापालिकेचा इतका सुरेख कार्यक्रम होत असताना मोजके पत्रकार मित्र सहकारी इथं हजर होते.

    आयुक्तांचे भाषण थोड्यावेळात किंवा उद्या अपलोड केलं जाईल.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email

    Related Posts

    KDMC मुख्यालयात नगररचना विभाग गडबड घोटाळा ! फाईली मुख्यालय बाहेर !

    MNS Kalyan आंदोलन धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या ! कार्यकर्त्यांनी प्रधान यांचे पोस्टर काळे केलं !

    कल्याण डोंबिवलीत मुसळधार पावसाचा राडा ! नागरिकांचे हाल !

    Leave A Reply Cancel Reply

    आमच्या संपर्कात रहा
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    • WhatsApp
    ताज्या बातम्या

    KDMC मुख्यालयात नगररचना विभाग गडबड घोटाळा ! फाईली मुख्यालय बाहेर !

    ADTP संतोष डोईफोडे साहेब…. एका विषय संदर्भात तुम्हाला कॉल करतोय… तुमच्या विभागातील फाईल्स दोन बॅगा…

    MNS Kalyan आंदोलन धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या ! कार्यकर्त्यांनी प्रधान यांचे पोस्टर काळे केलं !

    कल्याण डोंबिवलीत मुसळधार पावसाचा राडा ! नागरिकांचे हाल !

    Dombivali KHAMBALPADA MURDER CASE सिस्टिमचा बळी प्रताप चौधरी

    Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
    © 2026 Post Marathi Digital | All rights reserved.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.