दिनांक १ ९ ऑगस्ट २ ० २ ५ : कल्याण तालुक्यात आज सकाळी 7 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत दिवसभरात पडलेल्या मुसळधार पावसाची नोंद 70 मिलिमीटर झाली असल्याची माहिती कल्याण तालुका तहसीलदार कार्यालय यांनी कळवली आहे. उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली असल्यामुळे कल्याण मुरबाड शहराला जोडणारा रायता ब्रीज वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.


