केंद्रात राज्यात सत्तेत असलेल्या भाजपची नौटंकी ! कल्याणात पाण्यासाठी मोर्चा ! पत्रकारांना धडाधड कॉल करून बोलावले ! लोकप्रतिनिधी कार्यकाळात केडीएमसी मुख्यालयातील महापौर उपमहापौर स्थायी समिती सभापती पदे,विभिन्न प्रभाग समित्या,जिल्हा नियोजन सदस्यांच्या पदाचा बहुदा भाजपला विसर पडला आहे. म्हणूनच राज्यात केंद्रात सत्ता असतानाही त्यांना व ऐन पावसाळ्यात पाण्याचा मुद्दा घेत आपल्याच सरकार विरोधात रस्त्यावर उतरून हसू करावे लागले. कल्याण पूर्वेत दोन्ही शिवसेना सोबत भाजप चे पक्षीय बलाबल जवळ जवळ सारखे आहे.तरीही कल्याण पूर्वेतील नागरी समस्या सोडविण्यात त्यांना यश मिळाले नाही. कल्याण पूर्वेचे भले व्हावे या एकमेव हेतूने 2009 साली नव्याने तयार झालेल्या विधासनभा क्षेत्रात स्थानिक उमेदवार मुद्दा निश्चित झाला. बाहेरचा नको म्हणून कल्याण पूर्वेच्या मतदारांनी तसेच राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी अपक्ष टीव्ही निशाणी निवडणुकीत भरघोस मतांनी विजयी केली. आता गेल्या 15 वर्षापासून माजी आमदार गणपत काळू गायकवाड यांच्या घरात आमदारकी आहे. आधी अपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सोबत घरोबा पुढ टायमिंग बघून शिवसेनेच्या स्थानिक जिल्हा नेतृत्वाशी समजोता करत त्यानंतर 2019 / 2024 मध्ये थेट भाजप सोबत पक्ष प्रवेश गायकवाड यांनी केला. राजकारणी लोकांच्या अंतर्गत विरोधातून परिणामी कल्याण पूर्वीची परिस्थिती अत्यंत बिकट होत गेली. त्याला कल्याण लोकसभेचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनीही खतपाणी घातले. कल्याण पूर्वेतील विठ्ठलवाडी स्मशान भूमी चे विकास कार्य याच्या समोर असलेला तलाव सुशोभीकरण गेल्या 15 वर्षात कधीच परिपूर्ण झाले नाही. आता पर्यंत करोडो रुपयांचा निधी अर्थात जनतेचा कर रुपी पैसा इथ नासवला गेलाय. तो आजही नासवणे सुरूच आहे. कल्याण पूर्वेतील तथाकथित शिक्षित असलेले नेतृत्व धर्माच्या उकारड्यात लोळण घेत असल्याचे दिसून येत आहे. पूर्वेतील लोकांना येणाऱ्या काळात तो शाप ठरणार आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी आमदार सुलभा गायकवाड यांच्या नेतृत्वात काढलेला मोर्चा पालिकेच्या शहर अभियंत्यांनी यशस्वी केला. तसा त्यांना आयुक्त अभिनव गोयल यांचा आदेशच होता.

