कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या नगररचना विभागात सातत्याने बदली करून बिल्डर लॉबी सोबत संगतमनाताने कोट्यवधी रुपयांची वसुली करणाऱ्या बोक्याना महापालिका आयुक्त अभिनव गोयल ही हटवू शकणार नाहीत असा धक्कादायक आरोप पोस्ट मराठीशी बोलताना RTI ऍक्टिविस्ट कौतुभ गोखले यांनी केला आहे.
पोस्ट मराठी महानगरपालिकेतील नगररचना विभागात होत असलेल्या गैर कारभाराचा पोलखोल करत आहेत. आदिवासी प्रमाणपत्र दाखवून kdmc मध्ये कनिष्ठ अभियंत्याची नोकरी पदरात पाडून नगररचना विभागात तब्बल 21 वर्ष तळ ठोकून बसलेल्या सुरेंद्र टेंगळे,त्याच्या सोबत याच विभागात सतत बदली करून येणारे सुनील पाटील, दिपक मोरे, ज्ञानेश्वर आडके, मच्छिंद्र हंचाटे,देविदास जाधव,संजय पोखरकर या नगररचना विभागातील तांत्रिक पदावर असलेल्या अधिकारी कर्मचारी यांनी पालिकेच्या सामान्य प्रशासनाला अदृश्य ताकदीने झुकवले आहे.
उच्च न्यायालयाचे आदेश ,मंत्रालयातील नगररचना विभागातील शासनाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून यांनी भ्रष्ट सुनील जोशीच्या कारभाराला मागे टाकले आहे.
कुटुंबातील लोकांच्या नावे बिल्डर लॉबी सोबत हिडन भागीदारी करत करोडो रुपयांची उलाढाल करण्यात सद्या नगररचना विभाग नेमणुकीत असलेल्या या लोकांनी सर्वसामान्य जमीन मालकांना त्रास देणं सुरू केलं आहे. असा प्रकार सामाजिक कार्यकर्ते कौस्तुभ गोखले यांनी उघडकीस आणला आहे.
असे गैर कारभार सध्या कल्याण सेक्टर 1 मध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. प्रपोज बांधकाम मंजुरीत मूळ जागा मालकांची जमीन शेजारच्या प्लॉट मध्ये दाखवून नकाशे मंजूर केले जात आहेत.
बांधकाम क्षेत्रातील मोठ्या विकासकाना हाताशी धरून करोडो रुपयांची वसुली केली जाते. या अशा अनेक विषयांवर पालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी मौन धारण केलं आहे.