ठाणे: ६ एप्रिल हा दिवस भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस म्हणून भाजपाच्या वतीने साजरा करण्यात येत असतानाच या दिनाच्या पूर्वसंध्येला अंबरनाथ शहरातील भाजपाच्या कार्यलयावर १० ते १२ जणांच्या हल्लेखोर टोळीकडून तलवारीनं हल्ला केल्याची घटना समोर आली आहे ही घटना अंबरनाथ पूर्व भागातील बी कॅबिन रोड वरील भाजपाचे माजी नगरसेवक राजू महाडिक यांच्या कार्यालयात घडली आहे याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात डझनभर हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश पाटील यांनी दिली आहे आशुतोष कराळे उर्फ डक्या (वय २३) गाणी रफिक शेख ( वय २५) आणि यांचे इतर १० साथींदार असे गुन्हा दाखल झालेल्या हल्लेखोरांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंबरनाथ पूर्व भागातील बी कॅबिन रोड वर भाजपाचे माजी नगरसेवक राजू महाडिक यांचे जनसंपर्क कार्यालय आहे या कार्यलयात तक्रारदार कृष्णा गुप्ता ( वय २२) हा कार्यलय प्रमुख म्हणून कार्यरत आहे त्यातच ५ एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास हल्लेखोर आशुतोष कराळे उर्फ डक्या आणि गाणी रफिक शेख हे दोघे आपल्या १० साथीदारांसह अचानक कार्यलयात हातात तलवार घुसले त्यानंतर कार्यलयाची तोडफोड करत तक्रारदार कृष्णा गुप्ता याला मारहाण केली या हल्ल्यात कार्यलयाचे मोठे नुकसान झाले असून या सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस पथक घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करत कृष्णा गुप्ता याच्या फिर्यादीवरून बी भारतीय न्याय संहिता कलम १८९ (२) १८९ (४) १९० १९२ (२) ३२४(४) ३२४ (५) ११५ (२) ३५१(२) ३५२ (३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश पाटील यांनी सांगितले कि माजी नगरसेवक महाडिक आणि आरोपी याचे जुने भांडण होते याच भांडणाच्या रागातून कार्यलयावर हल्ला केल्याची माहिती त्यांनी दिली असून आरोपीच्या शोध घेण्यासाठी पोलीस पथक रवाना केल्याचेही त्यांनी सांगितले या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील चौरे करीत आहेत.