Close Menu
    अधिक वाचा

    Dombivali KHAMBALPADA MURDER CASE सिस्टिमचा बळी प्रताप चौधरी

    थेटभेट- लाँगमार्च प्रणेते मा.खासदार प्रा.जोगेंद्र कवाडे उपवर्गीकरण संदर्भात सरकारला खडेबोल

    थेटभेट आदिवासींच्या हक्कासाठी लढणारे ॲड राजेंद्र मरासकोल्हे अधिसंख्यांची गडबड

    मार्वे पठारे वाडीत 23 बेकायदा गोदामांवर बुलडोझर, 25 हजार चौरस फूट जागा मोकळी

    Facebook X (Twitter) Instagram
    Post Marathi DigitalPost Marathi Digital
    Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
    • मुख्य पान
    • बातम्या
    • 36 जिल्हे विशेष घडामोडी
    • बोला नगरसेवक
    • महापालिका विशेष बातम्या
    • राजकीय कट्टा
    • अभिव्यक्ती स्वातंत्र्य
    Post Marathi DigitalPost Marathi Digital
    Home»News»येत्या का्ळात प्रत्येक गिरणी कामगारांना घरे मिळतील – मंत्री अतुल सावे

    येत्या का्ळात प्रत्येक गिरणी कामगारांना घरे मिळतील – मंत्री अतुल सावे

    1 Views
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई, दि. 14 : अनेक दिवसांपासून गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रयत्नशील आहे. गिरणी कामगारांना हक्काचे घर मिळावे, यासाठी मुंबई महानगर क्षेत्रात गिरणी कामगारांसाठी घरे बांधण्यात येत आहे. आजमितीस गिरणी कामगारांचे 1 लाख 65 हजार अर्ज अर्ज प्राप्त झाले. त्यात कामगार विभागाने 1 लाख 18 हजार अर्ज वैध ठरविले. त्यामुळे या वैध अर्जाचा विचार करण्यात येत आहे. यापुढेही जास्तीत जास्त घरे बांधण्याचा आमचा मानस आहे, असे प्रतिपादन गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी आज केले.

    गिरणी कामगारांना मुंबई महानगर क्षेत्रात सदनिका उपलब्ध करून देण्यासाठी प्रकल्प प्रवर्तकांच्या निवडीसाठी तयार केलेल्या इओआय (एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट) मध्ये कर्मयोगी एव्हीपी रिॲलिटी आणि चढ्ढा डेव्हलेपर्स ॲण्ड प्रोमोटर्स या पात्र प्रवर्तकांना मंत्री श्री.सावे यांच्या हस्ते हेतू पत्र देण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव श्रीमती वल्सा नायर यावेळी उपस्थित होत्या.

    मंत्री श्री.सावे म्हणाले की, सन 1982 च्या संपानंतर बृहन्मुंबईतील 58 बंद/आजारी कापड गिरण्यांतील गिरणी कामगारांसाठी म्हाडामार्फत एकूण 15870 सदनिकांचे वाटप करण्यात आले आहे. म्हाडामार्फत आणखी 2874 सदनिकांचे गिरणी कामगारांना वाटप करता येणे शक्य आहे. उर्वरीत गिरणी कामगारांची पात्रता निश्चित करण्यात आली असून अजून साधारणत: 1 लक्ष घरांची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले.

    मंत्री श्री.सावे म्हणाले की, देशातील सर्वात मोठी कामगार वसाहत सोलापुरातल्या रे नगर येथे साकारली आहे. आज जवळजवळ 81 हजार घरे बांधण्याचा आम्ही करार केला आहे. मुंबई महानगर क्षेत्रामध्ये आम्ही दोन वेगवेगळ्या कंपन्यांना काम दिले असून त्यांच्या माध्यमांतून गिरणी कामगारांकरिता घरे बांधून दिली जाणार आहे. जे इच्छुक आहे त्यांना ही घरे दिली जातील. यामध्ये 5 लाख 50 हजार रूपये शासन तर उर्वरित 9 लाख 50 हजार रूपये घर मालकाला किंवा त्याच्या वारसदारांनी द्यावी लागतील. हे घर 15 लाख रूपयांत मिळणार असून पुढील 3 वर्षामध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहे. यात 300 चौ.फूटाचे राहण्यायोग्य घरकूल, कम्युनिटी हॉल, बाग, लहान मुलांसाठी खेळण्याची जागा, ज्येष्ठ नागरिकांसाठी छोटे उद्यान असेल. काळात प्रत्येक गिरणी कामगारांला घरे मिळण्याचा आमचा प्रयत्न राहणार असल्याचे मंत्री श्री.सावे यांनी यावेळी सांगितले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email

    Related Posts

    Dombivali KHAMBALPADA MURDER CASE सिस्टिमचा बळी प्रताप चौधरी

    थेटभेट- लाँगमार्च प्रणेते मा.खासदार प्रा.जोगेंद्र कवाडे उपवर्गीकरण संदर्भात सरकारला खडेबोल

    थेटभेट आदिवासींच्या हक्कासाठी लढणारे ॲड राजेंद्र मरासकोल्हे अधिसंख्यांची गडबड

    Leave A Reply Cancel Reply

    आमच्या संपर्कात रहा
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    • WhatsApp
    ताज्या बातम्या

    Dombivali KHAMBALPADA MURDER CASE सिस्टिमचा बळी प्रताप चौधरी

    स्कृतिक डोंबिवलीत लाडक्या बहिणीचा संसार उद्ध्वस्त प्रताप तुळशीराम चौधरी सिस्टिमचा बळी ! 26 मे रोजी…

    थेटभेट- लाँगमार्च प्रणेते मा.खासदार प्रा.जोगेंद्र कवाडे उपवर्गीकरण संदर्भात सरकारला खडेबोल

    थेटभेट आदिवासींच्या हक्कासाठी लढणारे ॲड राजेंद्र मरासकोल्हे अधिसंख्यांची गडबड

    मार्वे पठारे वाडीत 23 बेकायदा गोदामांवर बुलडोझर, 25 हजार चौरस फूट जागा मोकळी

    Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
    © 2026 Post Marathi Digital | All rights reserved.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.