येवला,दि.७ ऑक्टोबर :- राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने येवला तालुक्यातील कोटमगाव येथील जगदंबा मातेचे पूजन करत मनोभावे दर्शन घेतले. यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी मंदिर परिसराची पाहणी केली. तसेच उपस्थित भाविकांना नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी अरुण थोरात,भोलानाथ लोणारी,भाऊसाहेब भवर, सचिन कळमकर,ट्रस्टचे अध्यक्ष रावसाहेब कोटमे,राजेंद्र कोटमे, भाऊसाहेब आदमाने, लहानु धांद्रे, दिलीप कोटमे, अंबादास भोसले, अंबादास लहरे, गणेश कोटमे, शैला कलंत्री, रावसाहेब कोटमे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.