Close Menu
    अधिक वाचा

    MNS Kalyan आंदोलन धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या ! कार्यकर्त्यांनी प्रधान यांचे पोस्टर काळे केलं !

    कल्याण डोंबिवलीत मुसळधार पावसाचा राडा ! नागरिकांचे हाल !

    Dombivali KHAMBALPADA MURDER CASE सिस्टिमचा बळी प्रताप चौधरी

    थेटभेट- लाँगमार्च प्रणेते मा.खासदार प्रा.जोगेंद्र कवाडे उपवर्गीकरण संदर्भात सरकारला खडेबोल

    Facebook X (Twitter) Instagram
    Post Marathi DigitalPost Marathi Digital
    Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
    • मुख्य पान
    • बातम्या
    • 36 जिल्हे विशेष घडामोडी
    • बोला नगरसेवक
    • महापालिका विशेष बातम्या
    • राजकीय कट्टा
    • अभिव्यक्ती स्वातंत्र्य
    Post Marathi DigitalPost Marathi Digital
    Home»News»हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार, मराठी भाषेला अभिजात दर्जा

    हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार, मराठी भाषेला अभिजात दर्जा

    2 Views
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    स्मृतीस्थळावर बाळासाहेबांना वंदन, शिवसैनिकांचा जल्लोष

    मुंबई, ता. ४ ऑक्टोबर २०२४: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मराठी भाषेचा जाज्वल्य अभिमान होता. मराठीला अभिजात दर्जा मिळावा हे बाळासाहेबांचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी पूर्ण केले या निमित्त शिवसैनिकांनी आज शिवतीर्थावरील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करून एकच जल्लोष केला.

    गेल्या अनेक वर्षांपासून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही मागणी प्रलंबित होती. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी पदावर आल्यापासून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. केंद्र सरकारकडे आवश्यक दस्तावेज पुरवून पाठपुरावा केला होता. परिणामी ३ ऑक्टोबर हा ऐतिहासिक दिवस उजाडला आणि केंद्राने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देऊन सन्मानित केले.

    पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा देऊन हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासह कोट्यवधी मराठी भाषिकांचे स्वप्न साकार केले असल्याचे यावेळी खासदार मिलिंद देवरा यांनी सांगितले. या ऐतिहासिक घटने निमित्त शिवसैनिकांनी हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी पुष्प अर्पण करून अभिवादन केले. बाळासाहेबांचे स्वाभिमानी विचार शिवसैनिकांना सदैव प्रेरणा देत राहतील, अशी भावना उपस्थित शिवसैनिकांनी व्यक्त केली. यावेळी आमदार सदा सरवणकर, माजी आमदार, शिवसेना सचिव किरण पावसकर, माजी आमदार, शिवसेना सचिव मनीषा कायंदे , सह मुख्य प्रवक्ता डॉ. राजू वाघमारे आणि प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांच्यासह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email

    Related Posts

    MNS Kalyan आंदोलन धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या ! कार्यकर्त्यांनी प्रधान यांचे पोस्टर काळे केलं !

    कल्याण डोंबिवलीत मुसळधार पावसाचा राडा ! नागरिकांचे हाल !

    Dombivali KHAMBALPADA MURDER CASE सिस्टिमचा बळी प्रताप चौधरी

    Leave A Reply Cancel Reply

    आमच्या संपर्कात रहा
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    • WhatsApp
    ताज्या बातम्या

    MNS Kalyan आंदोलन धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या ! कार्यकर्त्यांनी प्रधान यांचे पोस्टर काळे केलं !

    कल्याण डोंबिवलीत मुसळधार पावसाचा राडा ! नागरिकांचे हाल !

    Dombivali KHAMBALPADA MURDER CASE सिस्टिमचा बळी प्रताप चौधरी

    थेटभेट- लाँगमार्च प्रणेते मा.खासदार प्रा.जोगेंद्र कवाडे उपवर्गीकरण संदर्भात सरकारला खडेबोल

    Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
    © 2026 Post Marathi Digital | All rights reserved.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.