Close Menu
    अधिक वाचा

    MNS Kalyan आंदोलन धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या ! कार्यकर्त्यांनी प्रधान यांचे पोस्टर काळे केलं !

    कल्याण डोंबिवलीत मुसळधार पावसाचा राडा ! नागरिकांचे हाल !

    Dombivali KHAMBALPADA MURDER CASE सिस्टिमचा बळी प्रताप चौधरी

    थेटभेट- लाँगमार्च प्रणेते मा.खासदार प्रा.जोगेंद्र कवाडे उपवर्गीकरण संदर्भात सरकारला खडेबोल

    Facebook X (Twitter) Instagram
    Post Marathi DigitalPost Marathi Digital
    Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
    • मुख्य पान
    • बातम्या
    • 36 जिल्हे विशेष घडामोडी
    • बोला नगरसेवक
    • महापालिका विशेष बातम्या
    • राजकीय कट्टा
    • अभिव्यक्ती स्वातंत्र्य
    Post Marathi DigitalPost Marathi Digital
    Home»News»जयदीप आपटेला कल्याण पोलिसांनी पकडले

    जयदीप आपटेला कल्याण पोलिसांनी पकडले

    0 Views
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    सिंधुदुर्ग येथील राजकोट येथे उभारण्यात आलेला पूर्णाकृती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना घडली होती. या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे याला काल सायंकाळी कल्याण येथून अटक करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर जनमानसात संतप्त लाट उसळली. या घटनेनंतर पुतळ्याचे शिल्पकार जयदीप आपटे यांना अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. आपटे यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटना घडल्याच्या दिवसापासून आपटे हे पसार झाले होते. आपटे यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विविध तपास पथके तयार केली होती. घटना घडल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून आपटे यांच्या कल्याण मधील बाजारपेठ परिसरातील घराला कुलूप होते. त्यांच्या घरासमोर संभाजी ब्रिगेड यांनी आंदोलन करून त्यांच्या घरावर शिवद्रोही असे लिहिण्याचा त्यांचा फोटो चिटकवण्यात आला होता. त्यांच्या घरासमोर अंडी फोडून निषेध करण्यात आला होता. त्यानंतर त्यांच्या पत्नीची पोलिसांनी चौकशी केली. आपटे यांच्या विषयी माहिती घेतली होती. तसेच त्यांच्या पत्नी त्यांच्या कल्याण मधील घरी परतल्या होत्या. जयदीप आपटे यांना तात्काळ अटक पोलीस पथके मागावर होती. बाजारपेठ पोलिसांना आज अशी माहिती मिळाली की आपटे हा त्याच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी त्याच्या कल्याण मधील बाजारपेठे येथील घरी येणार आहे. पोलिसांनी आपटेला त्याच्या घरी येतानाच अटक केली आहे. आपल्याला अटक करून तात्काळ पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांच्या कार्यालयात हजर केले आहे. पोलिसांकडून त्याची पुढील चौकशी सुरू करण्यात आली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email

    Related Posts

    MNS Kalyan आंदोलन धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या ! कार्यकर्त्यांनी प्रधान यांचे पोस्टर काळे केलं !

    कल्याण डोंबिवलीत मुसळधार पावसाचा राडा ! नागरिकांचे हाल !

    Dombivali KHAMBALPADA MURDER CASE सिस्टिमचा बळी प्रताप चौधरी

    Leave A Reply Cancel Reply

    आमच्या संपर्कात रहा
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    • WhatsApp
    ताज्या बातम्या

    MNS Kalyan आंदोलन धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या ! कार्यकर्त्यांनी प्रधान यांचे पोस्टर काळे केलं !

    कल्याण डोंबिवलीत मुसळधार पावसाचा राडा ! नागरिकांचे हाल !

    Dombivali KHAMBALPADA MURDER CASE सिस्टिमचा बळी प्रताप चौधरी

    थेटभेट- लाँगमार्च प्रणेते मा.खासदार प्रा.जोगेंद्र कवाडे उपवर्गीकरण संदर्भात सरकारला खडेबोल

    Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
    © 2026 Post Marathi Digital | All rights reserved.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.