कल्याण शहर मुख्य डाकघर कार्यालयातर्फे ‘डाक चौपाल’चे आयोजन पश्चिमेकडील बालक मंदिर संस्थेच्या सभागृहात शनिवारी करण्यात आले होते. या दरम्यान ७०७ खाती उघडण्यात आली असून २ कोटी २६ लाख ७० हजार ९५० रुपये इतका व्यवसाय करण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रवर डाक अधीक्षक, (ठाणे मंडळ) समीर महाजन, असिस्टंट कमिशनर (जीएसटी) हेमलता सूर्यवंशी, कल्याण व्यापारी संघटना अध्यक्ष उमेश बोरगांवकर, सेंच्युरी रेयॉन शाळेच्या मुख्याध्यापिका बबिता सिंग, ओक शाळेचे मुख्याध्यापक दिलीप तडवी, कल्याण सिटी हेड ऑफिस पोस्ट मास्तर अशोक सोनवणे उपस्थित होते.
‘डाक चौपाल सरकार आपल्या दारी’ या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश पोस्ट कार्यालयाच्या विविध योजनांचा प्रसार आणि प्रचार करणे व या सर्व योजना एका छताखाली सर्व सामान्य जनतेस उपलब्ध करणे हा आहे. त्या उद्देशाने याठिकाणी आधार सेंटर, महिला सन्मान योजना, सुकन्या सम्रुद्धी योजना, लाडकी बहिण योजना, ऑनलाईन खाते, पोस्टल जीवन विमा आदी योजना नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आल्या. या योजनेचा लाभ शेकडो नागरिकांनी घेतला.
या कार्यक्रमाला पोस्टल कर्मचारी, अभिकर्ता, ज्येष्ठ नागरिक, अंगणवाडी पर्यवेक्षक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.


