मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्ह्यात दिव्यांग लाडक्या बहिणी kdmc मुख्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनात रक्षा बंधन फुटपाथवर साजरी करणार ! रक्षा बंधन सोमवारी असून त्यासाठी या भगिनी हातावर मेहेंदी काढताहेत !
आंदोलनात पालिकेडून लेखी पत्र देण्याचे टाळले जात असल्यामुळे स्वतंत्र दिनाच्या पूर्व संध्या पासून सुरू असलेले दिव्यांग बहिण भावांचे धरणे आंदोलन अजूनही सुरू आहे !
शिंदे गटाचे स्थानिक आमदार विश्वनाथ भोईर यांनी आंदोलनकर्ते दिव्यांग बांधवांच्या विषयी पालिका आयुक्त श्रीमती डॉ. जाखड यांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.