जोंधळे शिक्षण समुहाचे सर्वेसर्वा शिक्षण महर्षी शिवाजी राव जोंधळे यांची हत्या झाल्याचा खळबळजनक आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी आज डोंबिवलीत एक पत्रकार परिषद घेऊन केला आहे. विष्णुनगर पोलिसांना तक्रार देऊनही त्यांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्यामुळे या संदर्भात कल्याण न्यायालयात दाद मागितली त्यानुसार न्यायालयाच्या आदेशाने दिनांक 17 ऑगस्ट 2024 रोजी पाच लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लिव्हर कॅन्सर सारख्या गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या शिवाजी राव जोंधळे यांना उपचार मिळू नये म्हणून 10 एप्रिल ते 16 एप्रिल 2024 पर्यंत त्यांच्या डोंबिवली पश्चिम शिव गीता बंगल्यात तिसऱ्या मजल्यावर कोंडून ठेवलं. त्यांना कुनाशी भेटू दिले नाही. या प्रकरणात स्थानिक लोकनेते प्रमोद हिंदुराव पोलिस प्रशासनावर दबाव टाकत असून सराईत गुंड प्रशांत देशमुख उर्फ पी. डी याच्या पासून आमच्या संपूर्ण कुटुंबाचा जीव धोक्यात असल्याचे सागर जोंधळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. प्रमोद हिंदुराव सत्ताधारी पक्षातील घटक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांचे राज्य कार्यकारणी पदाधिकारी आहेत. या आरोपांबाबत त्यांना प्रतिक्रिया साठी कॉल केला असता ते मुरबाड ला असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच प्रतीक देशमुख नातेवाईक असल्याचे ते म्हणाले. कल्याणला आल्यावर कॉल करतो. असे बोलून त्यांनी मोबाईल कट केला.
आज झालेल्या पत्रकार परिषदेत सागर जोंधळे यांच्या सोबत त्यांची आई श्रीमती वैशाली ताई जोंधळे,दोन मोठ्या बहिणी,भाऊ देवेंद्र जोंधळे,चुलत भाऊ नातेवाईक हजर होते.

