अटल सेतूवर एक ५६ वर्षीय महिला उडी घेवून आत्महत्येचा प्रयत्न करत असताना नावाशेवा वाहतूक विभागाचे @Navimumpolice पो.ना. शिरसाठ, पो ना. किरण मात्रे, पोलीस शिपाई यश सोनवणे व पो शि. मयूर पाटील यांनी प्रसंगावधान दाखवत पुलाच्या रेलिंगवरून उडी घेवून महिलेचे प्राण वाचविले. त्याबद्दल मी त्या सर्वांचे अभिनंदन करतो.
तसेच नागरिकांना विनंती करतो की जीवन अमुल्य अशी देणगी आहे. कोणत्याही परिस्थितीत आवेगाने वागू नका. तुमच्यासोबत तुमचे प्रियजन आहेत हे कधीही विसरू नका.

