Close Menu
    अधिक वाचा

    बिर्ला महाविद्यालयाची पारंपरिक ज्ञान दिंडी ! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची हजेरी

    ठाकरे बंधू मनोमिलन थेटभेट – ज्येष्ठ पत्रकार विवेक कांबळे

    KDMC नगररचना विभागातील बोके ! आयुक्त गोयल हटवू शकत नाही !

    Retired sanitation worker meets Municipal Commissioner Abhinav Goyal on Lokshahi Din

    Facebook X (Twitter) Instagram
    Post Marathi DigitalPost Marathi Digital
    Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
    • मुख्य पान
    • बातम्या
    • 36 जिल्हे विशेष घडामोडी
    • बोला नगरसेवक
    • महापालिका विशेष बातम्या
    • राजकीय कट्टा
    • अभिव्यक्ती स्वातंत्र्य
    Post Marathi DigitalPost Marathi Digital
    Home»News»चेंबूरच्या सिद्धार्थंनगरमधील आग दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    चेंबूरच्या सिद्धार्थंनगरमधील आग दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    1 Views
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    दुर्घटना स्थळाची पाहणी; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

    मुंबई, दि. ६:- चेंबूर येथील सिद्धार्थनगर मधील आगीच्या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत दिली जाईल. तसेच जखमींवर शासनाच्या खर्चाने उपचार केले जातील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

    मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आज या दुर्घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यात त्यांनी दुर्दैवी कुटुंबियांची आस्थेने विचारपूस केली. तसेच त्यांना सर्वतोपरी आधार देण्याचा दिलासा दिला.

    दूर्घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. ते म्हणाले की,
    ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. गुप्ता कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी होईल. अशा दुर्घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी काळजी घेता यावी यासाठी उपाययोजनांचाही आढावा घेतला जाईल. याठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसनाचे काम रखडले असेल,तर त्याबाबतही बैठक घेऊन योग्य ते निर्णय घेतले जातील, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

    यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, माजी खासदार राहुल शेवाळे, तसेच मुंबई महापालिकेचे अधिकारी आदी उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email

    Related Posts

    बिर्ला महाविद्यालयाची पारंपरिक ज्ञान दिंडी ! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची हजेरी

    ठाकरे बंधू मनोमिलन थेटभेट – ज्येष्ठ पत्रकार विवेक कांबळे

    KDMC नगररचना विभागातील बोके ! आयुक्त गोयल हटवू शकत नाही !

    Leave A Reply Cancel Reply

    आमच्या संपर्कात रहा
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    • WhatsApp
    ताज्या बातम्या

    बिर्ला महाविद्यालयाची पारंपरिक ज्ञान दिंडी ! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची हजेरी

    ठाकरे बंधू मनोमिलन थेटभेट – ज्येष्ठ पत्रकार विवेक कांबळे

    KDMC नगररचना विभागातील बोके ! आयुक्त गोयल हटवू शकत नाही !

    Retired sanitation worker meets Municipal Commissioner Abhinav Goyal on Lokshahi Din

    Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
    © 2025 Post Marathi Digital | All rights reserved.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.