नाशिक,नांदगाव,दि.५ऑक्टोबर :- राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे मुंबई अध्यक्ष तथा माजी खासदार समीर भुजबळ यांच्या संकल्पनेतून नांदगाव मनमाड विधानसभा मतदारसंघातील लाडक्या भगिनींसाठी नवरात्र उत्सवानिमित होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आज नांदगाव येथे होम मिनिस्टर फेम भूषण कापडने, अभिनेत्री सोनाली पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महाजन वाडा नांदगाव येथे मोठ्या उत्साहात हा सोहळा पार पडला. या प्रसंगी माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ, डॉ.शेफाली भुजबळ यांनी उपस्थितांना नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ, डॉ.शेफाली भुजबळ, तालुका अध्यक्ष विजय पाटील, शहराध्यक्ष अरुण पाटील, संगीता सोनवणे, अपर्णा देशमुख, सीमा राजोळे, प्रताप दादा गरुड, सोपान पवार, विलास राजोळे, प्रसाद सोनवणे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या.
या प्रसंगी होम मिनिस्टर फेम भूषण कापडणे यांच्या खुमासदार सूत्रसंचालन आणि “खेळ पैठणीचा” या स्पर्धेने अतिशय रंगत आणली. तसेच अभिनेत्री सोनाली पाटील यांनी उपस्थित महिला भगिनींशी संवाद साधला. महिला भगिनींनी या कार्यक्रमात अतिशय उत्स्फूर्तपणे मोठ्या सहभाग नोंदवीत कार्यक्रमाचा आनंद घेतला. या कार्यक्रमात महिलांनी मनोरंजनाच्या मेजवानीसह विविध खेळांमध्ये सहभाग घेत पैठणी व इतर आर्कषक बक्षिसे जिंकली.